You are currently viewing कोळपे जिल्हा परिषद भाजपाकडे; प्रमोद रावराणे बिनविरोध

कोळपे जिल्हा परिषद भाजपाकडे; प्रमोद रावराणे बिनविरोध

पालकमंत्री नितेश राणेंच्या राजकीय दबदब्यामुळे उबाठाची माघार; वैभववाडीत भाजपाचा जल्लोष

वैभववाडी :

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उबाठा सेनेचे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही निवड निर्विवाद ठरली.

या मतदारसंघात उबाठा सेनेचे दुसरे उमेदवार सुनिल नारकर यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. त्यानंतर उरलेले उमेदवार जितेंद्र तळेकर यांनीही रिंगणातून माघार घेतल्यामुळे भाजपाचा विजय निश्चित झाला. याशिवाय भाजपाचे डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके आणि अतुल सरवटे यांनीही अर्ज मागे घेतल्याने एकमेव उमेदवार म्हणून प्रमोद रावराणे बिनविरोध ठरले आहेत.

प्रमोद रावराणे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच वैभववाडीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याआधी कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार साधना नकाशे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने उबाठा सेनेला एकामागून एक धक्के दिले असून, भाजपाचा विजयाचा वारू वेगाने धावत आहे. भाजपात उत्साहाचे वातावरण असताना उबाठा सेनेत मात्र सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा