श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कला दर्पण वार्षिक महोत्सव संपन्न
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कला दर्पण या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षीक महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापिठ सिनेट सदस्य
युवराज लखमराजे
भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, सहसंचालक अॅड. शामराव सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महोत्सवाचे समन्वयक डाॅ. डी.जी.बोर्डे, डाॅ.एस.एम.बुवा, डॉ . एस ए.देशमुख ,कनीष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.व्हि.पी.राठोड,सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्धाटन दिपप्रज्वलनाने झाले.
कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज जीवनदर्शन ,हिंदी व मराठी चित्रपटाच्या गाण्यावर डान्स ,ग्रुप डान्स ,गायन,समई नृत्य, तबला वाद्य अशा विविध कला सादर केल्या.
याप्रसंगी महाविद्यालयातील कु. शरद डीचोलकर व क़ु.पियुष बर्डे या विद्यार्थ्यांची भारतीय सेनेमध्ये अग्निवीर म्हणून निवड झाली याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमराजे भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ. एस एम बुवा यांनी केले तर आभार डॉ. एस ए देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.जी बोर्डे यांनी केले कला सांस्कृतिक विभागाचा आढावा घेतला. प्रा.दत्तप्रसाद मुळीक यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कला दर्पण या वार्षिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

