पुणे:
पुण्यातील धायरी सिंहगड रोड येथील हायब्लिस या उच्चभ्रू सोसायटीत अत्यंत भक्तिभावपूर्ण उत्साहात माघी गणेश जयंती उत्सव सोहळा पार पडला. मंदिराची अत्यंत उत्तम सजावट तसेच यथायोग्य अभिषेक, पूजा या प्रसंगी आयोजित केली होती.
या प्रसंगी सोसायतील सर्व रहिवासी आवर्जून उपस्थित होते.
हायब्लिस सोसायटीचे सर्व पदाधिकारी परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री यशवंत लायगुडे , हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे ,गंगाधर भडावळे , संतोष चाकणकर, श्री व सौ. सारंग नवले , असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सोसायटीतील ज्येष्ठवृंद सर्वश्री सुधीर मोने , जगजीने , श्रीकांत नाईक, बिपीन देशमुख , पाटील साहेब , कांचडकर , भरेकर साहेब , दिलीप सातपुते , सचिन साखरकर, कौस्तुभ सातपुते , प्रोफेसर नितीन पगार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली..
