You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचा सलग त्रेसष्ठावा मासिक कार्यक्रम थाटात संपन्न
Oplus_16908288

साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचा सलग त्रेसष्ठावा मासिक कार्यक्रम थाटात संपन्न

*सातार्डा येथील टिळक ग्रंथालयात पार पडला कार्यक्रम*

सावंतवाडी / सातार्डा :

“शब्दांचा जादूगार- रवींद्र पिंगे” हा पिंगेच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त कार्यक्रम सातार्डा येथील टिळक ग्रंथालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवार दि. २२ जानेवारी, सायं. ४ वा. सातार्डा पंचक्रोशीतील टिळक ग्रंथालय येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रेरणा साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, गजानन मांद्रेकर, टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी साहित्य प्रेरणा कट्ट्याचे श्री विनय सौदागर व प्राचार्य श्री गजानन मांद्रेकर यांनी पिंगेंचे जीवन व साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सदस्यांनी पिंगेंच्या ललित लेखांचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य व सातार्डा पंचक्रोशीतील साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून साहित्यिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यानी परिश्रम घेऊन उत्तम नियोजन केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा