You are currently viewing जाणवली जि.प. मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला

जाणवली जि.प. मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला

शिवसेना उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध ; उबाठा सेनेला आणखी एक राजकीय हादरा

कणकवली :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत कणकवली तालुक्यात भाजप–शिवसेना महायुतीने आपले वर्चस्व अधिक ठामपणे सिद्ध केले आहे. जाणवली जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीच्या शिवसेना उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. उबाठा गटाच्या उमेदवार हेलन जितेंद्र कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा मतदारसंघ बिनविरोध ठरला.

या घडामोडीमुळे उबाठा सेनेला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला असून, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय रणनीतीची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. कणकवली तालुक्यातून शिवसेनेची ही पहिली जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवड ठरली आहे.

हेलन कांबळे यांच्या माघारीनंतर रुहिता तांबे या एकमेव उमेदवार राहिल्याने जाणवली मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. बिनविरोध निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करत रुहिता तांबे यांचे अभिनंदन केले.

या निकालामुळे कणकवली तालुक्यातील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, पुढील टप्प्यात आणखी बिनविरोध निवडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा