*प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडीट उद्घाटन सोहळ्याचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे थेट प्रक्षेपण .*
वेंगुर्ले
माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम , केरळ येथुन “प्रधानमंत्री स्वनिधी योजने ” अंतर्गत देशभरात एक लाख कर्जाचे वितरण तसेच क्रेडिट कार्डाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी स्थानिक पथविक्रेत्यांचे अभिसरण करुन क्रेडिट कार्ड अर्ज बॅकांकडे पाठविण्यात आले .
यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , नगरसेवीका अँड. सुषमा प्रभुखानोलकर , नगरसेवक सुधीर पालयेकर , नगरसेवक विनय नेरुरकर , नगरसेवक सदानंद गिरप , नगरसेवीका शितल आंगचेकर , नगरसेविका गौरी माइणकर , नगरसेविका काजल कुबल , नगरसेवक सचिन शेटये , नगरसेविका रिया केरकर , नगरसेविका लिना म्हापणकर , नगरसेवीका आकांक्षा परब , प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील , गणेश कांबळे , संगीता कुबल , ज्ञानेश्वर जाधव तसेच नगरपरिषद कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते .
