वेंगुर्लेत १ उमेदवारी अर्ज अवैध, ९८ उमेदवारी अर्ज वैध…
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातून आज झालेल्या छाननीत सर्व ३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समिती च्या ६२ उमेदवारी अर्जातून रेडी प.स.अपक्ष उमेदवार सानिया भोसले यांचा एक अर्ज अवैद्य ठरला त्यामुळे आता एकूण ९९ उमेदवारी अर्जांपैकी ९८ उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
वेंगुर्ले तहसील कार्यालयात वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक अधिकारी हेमंत किरुळकर व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत ८२ उमेदवारांनी सादर केलेल्या ९९ उमेदवारी अर्जातून पंचायत समिती रेडी गणातून सानिया भोसले (अपक्ष) यांचा एकच अर्ज अवैध ठरला.मात्र त्यांचा जिल्हा परिषद साठी सादर केलेला अर्ज वैध ठरला आहे.
