मालवण तालुक्यातील जि. प. च्या ६ तर पं. स. च्या १२ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज वैध…
मालवण :
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या महिला उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अथवा पावती दाखल नसल्याने अवैध ठरविण्यात आला. छाननी अंती मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद जागांसाठी २८ तसेच पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
वैध उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषद आडवली मालडीसाठी सोनाली सुनिल घाडीगांवकर ( शिवसेना), माधुरी प्रशांत सावंत (शिवसेना उबाठा), सीमा सतीश परुळेकर (अपक्ष), रंजना महादेव पडवळ (अपक्ष)
आचरा जिल्हा परिषद जागेसाठी संजना सचिन रेडकर (शिवसेना उबाठा), वर्षा मांगीरिश सांबारी (शिवसेना), पूर्वा परेश तारी (अपक्ष), अनुष्का प्रशांत गावकर (अपक्ष).
मसुरे जिल्हा परिषद जागेसाठी क्षमा संदीप हडकर (भाजपा), राधिका श्रीकृष्ण परब (शिवसेना), आनंदी आबा परब (शिवसेना उबाठा), सानिका सुशांत सुर्वे (अपक्ष), ऋतिका विरेश तोंडवळकर (अपक्ष), राधिका श्रीकृष्ण परब (अपक्ष).
सुकळवाड जिल्हा परिषद जागेसाठी गौतमी संदीप तळगावकर (वंचित बहुजन आघाडी), पूजा हृदयनाथ चव्हाण (शिवसेना उबाठा), सुमेधा संतोष पाताडे ( शिवसेना), माधुरी यशवंत चव्हाण (अपक्ष).
पेंडूर जिल्हा परिषद जागेसाठी संतोष वसंत साटविलकर (शिवसेना), सुमित अरुण सावंत (अपक्ष), घनश्याम गंगाधर राणे (शिवसेना उबाठा), दर्शन बाळकृष्ण म्हाडगुत (अपक्ष), दिलीप गंगाधर सावंत (अपक्ष).
वायरी भूतनाथ जागेसाठी साक्षी भगवान लुडबे (शिवसेना उबाठा), प्राची पराग माणगावकर (काँग्रेस), समीक्षा संदीप खोबरेकर (अपक्ष), अक्षता राजन गावडे (अपक्ष), संजीवनी संजय गावडे (शिवसेना) असे एकूण २८ उमेदवारांचे अर्ज जिल्हा परिषदेसाठी ६ जागांसाठी वैध ठरले आहेत.
मालवण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ जागांमध्ये आडवली मालडी जागेसाठी सीमा परुळेकर (भाजपा), मानसी वेंगुर्लेकर (शिवसेना), रोहिणी राऊत (शिवसेना उबाठा), कमल घाडीगावकर (अपक्ष).
शिरवंडे जागेसाठी दीपक चव्हाण (शिवसेना), युवराज मेस्त्री (शिवसेना उबाठा), अरुण मेस्त्री (अपक्ष), शुभम मटकर (अपक्ष).
चिंदर जागेसाठी दीपक सुर्वे (भाजपा), समीर लब्दे (शिवसेना उबाठा), पंढरीनाथ हडकर (शिवसेना), महेंद्र मांजरेकर (काँग्रेस), मनोज हडकर (अपक्ष).
आचरा जागेसाठी लवू मालंडकर (शिवसेना उबाठा), प्रवीण आचरेकर (काँग्रेस), शंकर वस्त (अपक्ष), गणेश तोंडवळवकर (शिवसेना), धनंजय टेमकर (अपक्ष), जुबेर काझी (अपक्ष).
कोळंब जागेसाठी योजना कांबळी (भाजपा), पूजा गवंडी (शिवसेना उबाठा).
मसुरे मर्डे जागेसाठी संतोष पालव (अपक्ष), वैभव चव्हाण (शिवसेना उबाठा), आत्माराम गावकर (अपक्ष), अमरेश सावंत (अपक्ष), संजय ठाकूर (शिवसेना), राहुल सावंत (अपक्ष), जितेंद्र परब (अपक्ष).
पोईप जागेसाठी प्रज्ञा चव्हाण (शिवसेना), शुभ्रा मांजरेकर (अपक्ष), प्राजक्ता परब (शिवसेना उबाठा), सायली पालव (अपक्ष).
सुकळवाड जागेसाठी प्रीती सावंत (अपक्ष), प्रसाद मोरजकर (अपक्ष), सागर कुशे (अपक्ष), प्रणय मयेकर (शिवसेना उबाठा), संतोष गावडे (भाजपा), प्रकाश पावसकर (अपक्ष), स्वप्नील गावडे (अपक्ष), सुनील पाताडे (अपक्ष), सुभाष लाड (अपक्ष), संजय पाताडे (अपक्ष).
वराड जागेसाठी माधुरी मसुरकर (भाजपा), दिक्षा रेवडेकर (शिवसेना उबाठा).
पेंडूर जागेसाठी सप्तशीला धामापूरकर ( शिवसेना उबाठा), रिया बावकर (शिवसेना).
कुंभारमाठ जागेसाठी प्रणिता लंगोटे (शिवसेना उबाठा), रश्मी लुडबे (अपक्ष), मानसी भोगावकर (शिवसेना).
वायरी भूतनाथ जागेसाठी पास्कोल रॉड्रीग्ज (शिवसेना उबाठा), देवानंद लुडबे (काँग्रेस), घनश्याम झाड (भाजपा) असे एकूण ५२ उमेदवारी अर्ज १२ जागांसाठी वैध ठरले आहेत याबाबतची माहिती निवडणूक निर्णय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
