सावंतवाडी सालाईवाडा मेन रोड वर झालेल्या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.
सावंतवाडी
काल रात्री 9:30 च्या सुमारास रस्त्यावरून चालत असताना कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने अन्विता सावंत 55 या महिलेला मागून जोरदार टक्कर दिली असता तिच्या उजव्या पायाला, कमरेखालील भागाला पफॅक्चर झाल व बरगड्यांना देखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे तर सुदैवाने दुसरी महिला श्रीमती भोसले या महिला बाल बाल बचावल्या परंतु अपघातानंतर कारचालक मात्र तेथून पळून गेला असता त्याच भागातील उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तेथील ग्रामस्थ हरीश कोटेकर यांच्या रिक्षेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, रूपा मुद्राळे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी त्या महिलेला तिच्यावर प्राथमिक उपचारासाठी मोलाचे सहकार्य केले व तिचे नातेवाईक आल्यानंतर तिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी तत्काळ गोवा बांबूळी येथे हलवण्यात आले. त्यावेळी सावंत यांच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांचे व ॲड.निरवडेकर यांचे आभार मानले.श्रीमती सावंत या आरपीडी हायस्कूलमध्ये क्लार्क असल्याचे समजलं.
