You are currently viewing ओरोस बु. जि.प. मतदारसंघात सुप्रिया संतोष वालावलकर यांचा दमदार प्रवेश
Oplus_16908288

ओरोस बु. जि.प. मतदारसंघात सुप्रिया संतोष वालावलकर यांचा दमदार प्रवेश

भाजप–शिवसेना महायुतीच्या बळावर विजयाचा निर्धार; अर्ज दाखलवेळी समर्थकांची जोरदार उपस्थिती

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया संतोष वालावलकर यांनी आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांनी ओरोस बु. जिल्हा परिषद मतदारसंघातून कुडाळ तहसीलदार कार्यालयात अधिकृतपणे अर्ज सादर केला.

अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुप्रिया वालावलकर यांनी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीवर ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत ओरोस परिसरात राबवलेल्या विकासकामांना मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे यावेळीही महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंचायत समिती सदस्या म्हणून केलेल्या कामांमुळे सुप्रिया वालावलकर यांचा ओरोस व परिसरात मजबूत जनसंपर्क आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष देणारी नेतृत्वशैली आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळेच पक्षाने त्यांच्यावर जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगण्यात येते. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा