रॅपिड अ‍ॅटिजन टेस्टबाबत विश्‍वासार्हता नसताना दिला जातोय भर: वाढतेय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या…

रॅपिड अ‍ॅटिजन टेस्टबाबत विश्‍वासार्हता नसताना दिला जातोय भर: वाढतेय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या…

उद्या  मनसे करणार  जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन: परशुराम उपरकर.

कणकवली प्रातिनिधी
जिल्हयातील कोरोना रूग्णांच्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अयोग्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. रॅपिड अ‍ॅटिजन टेस्टबाबत विश्‍वासार्हता नसताना या टेस्टवर दिला भर दिला जात असून त्यामधून पॉझिटीव्हची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालये तसेच तालुकानिहाय कोविड सेंटरकडे होणारे दुर्लक्ष, तेथील रुग्णांची होणारी गैरसोय, खरेदीतील घोटाळा, चढ्या दराच्या निविदा तसेच उपसंचालक पातळीवर नर्सेसच्या बदल्यांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्यावतीने उदया सोमवार ७ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वा. पासून जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा