सिंधुदुर्गनगरी :
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले सदर पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.