सावंतवाडी :
सावंतवाडी येथील सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विशेष प्रजासत्ताक दिन स्नेहसंमेलन तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा व प्रभागातील नगरसेवक-नगरसेविकांचा स्नेह सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण आज नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना देण्यात आले.
यावेळी रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, महिला अध्यक्षा दिशा कामत, उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका सुकन्या टोपले, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, सदस्य गुरुदत्त कामत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित या स्नेहसंमेलनात देशभक्तीपर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रजासत्ताक दिन अभिवादनाने होणार असून सायंकाळी ७.०० ते ८.०० दरम्यान फॅन्सी ड्रेस व वक्तृत्व स्पर्धा, तर ८.०० ते ९.०० या वेळेत सांस्कृतिक कला-गुणांचे सादरीकरण होईल. रात्री ९.०० वाजल्यापासून स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वोदयनगर गार्डन, भारत गॅस गोडाऊन शेजारी येथे होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष नगरसेवक अजय गोंदावळे, सचिव मेघना राऊळ, महिला अध्यक्षा दिशा कामत, महिला सचिव शरयू बार्देस्कर व सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
