*⭕ निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न*
*◼️ दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन*
आज दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये निवती किल्ल्यावरील बालेकिल्याच्या आतील बाजू, समोरील खंदक, पूर्वेकडील तटबंदीची बाहेरील बाजू, पूर्वेकडील बुरुज, पश्चिमेकडील तटबंदीची बाहेरील बाजू या सर्व ठिकाणची झाडी साफ करण्यात आली त्यामुळे आता बालेकिल्ला आतून तसेच चहू बाजूनी स्वच्छ झाला आहे. लवकरच दुर्ग प्रेमीना निवती किल्ल्यावरील बालेकिल्ल्याच्या सभोवताली फिरून दुर्ग दर्शन घेता येणार आहे.
या मोहिमेत यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, रोहन राऊळ, समिल नाईक,गणेश नाईक यांनी सहभाग घेतला.
