You are currently viewing फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन-2026” चा शुभारंभ

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन-2026” चा शुभारंभ

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन-2026” चा शुभारंभ

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून झाले उद्घाटन

कणकवली :

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन -२०२६” चा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, अनंत पिळणकर, कवी-लेखक-निवेदक निलेश पवार, फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका आस्था कदम, कदम सर, आर्या बिडये, आदी कॉलजचे विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. फ्लोरेट कॉलेजच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रदर्शनास विद्यार्थी यांनी केलेल्या अनोखा कलाकृतीची पाहणी केली. यामध्ये लहान मुलांसाठी किड्स बेडरूम, निसर्गाच्या सानिध्यातील कॅफेची संकल्पना, हॅन्डमेड केलेले नेकलेस, विविध प्रकारच्या कलाकृती यावेळी मुलांनी प्रदर्शनास सादर केल्या.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीमध्ये अश्या नवीन संकल्पनेचे कौतुक केले. मुलांमध्ये नव-नवीन संकल्पना निर्माण करण्याचे काम या फ्लोरेट कॉलेजच्या माध्यमातून आपण करत असल्याचे सांगितले. मुलांनी या कॉलेजच्या माध्यमातून केलेल्या कलाकृती ह्या खरच कौतुकास्पद आहेत. आपल्या फ्लोरेट कॉलेजच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडूदेत अश्या शुभेच्या यावेळी पारकर यांनी दिल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी फ्लोरेट कॉलेजच्या आरंभ प्रदर्शनास शुभेच्या दिल्या. आपल्या फ्लोरेट कॉलेजच्या माध्यमातून मुलांनी केलेल्या अनोख्या कलाकृती ह्या कौतुकास्पद आहेत. या मुलांनी केलेल्या अनोख्या कलाकृती मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या केलेल्या कलाकृतीची मुलांना आवड निर्माण होणार आहे. आताच्या युवा पिढीला इंटीरियर व फॅशन डिझाईनहा एक चांगला करियर साठी पर्याय निर्माण झाला आहे. कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आरंभ प्रदर्शनाला भेट देऊन केलेल्या कलाकृती पहाव्यात असे प्रतिपादन यावेळी नाईक यांनी केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा