You are currently viewing कणकवली न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात रद्द

कणकवली न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात रद्द

कणकवली न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात रद्द

संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता, ॲड अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

जमिन जागेच्या मुद्द्यावरून झाले होती मारहाण

ओरोस

जमिन जागेच्या कारणावरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी धरून कणकवली न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात रद्द करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी संशयित आरोपी भालचंद्र राजाराम राणे रा. फोंडाघाट आणि दिनेश सदाशिव राणे रा. डामरे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ॲड अशपाक शेख, ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे, ॲड. विनय रजपूत, ॲड. रईस शेख यांनी काम पाहिले.

फोंडाघाट येथे खरेदी केलेल्या जमिन जागेवरून वाद असल्याने भालचंद्र राणे अणि दिनेश राणे यांनी डामरे येथील आपल्या दुकानात येऊन आपल्याला मारहाण केली तसेच शीवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. २६ मे २०१९ रोजी ही घटना घडली असल्याबाबतची तक्रार डामरे येथील सत्यवान सावंत यांनी कणकवली पोलिसांत दिली होती. यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीवर भादवि ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये दोषारोप ठेवला होता.
कणकवली न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने १० मार्च २०२३ रोजी त्यांना दोषी ठरवून विविध कलमांन्वये वेगवेगळी शिक्षा आणि दंड ठोठावला होता. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाची असल्याने एक वर्ष कारावास आणि १० हजार रूपये दंड असे या शिक्षेचे स्वरूप होते. दरम्यान या शिक्षेविरोधात दोन्ही राणे यांनी जिल्हा व सत्र न्यायलयाकडे अपिल दाखल केले होते. यावरील सुनावणीत सबळ पुरावे न्यायालयासमोर न आल्याने वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा