You are currently viewing जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला: अर्चना घारेंच्या हस्ते उद्घाटन

बांदा

श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उदघाटन अर्चना फौंडेशनच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बांदा सरपंच प्रियांका नाईक, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, संदीप घारे, प्रशांत पांगम, समीर सातार्डेकर, विवेक गवस, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा अंगणवाडी ते इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी, इयत्ता नववी ते खुला असे गट ठेवण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
अर्चना घारे-परब म्हणाल्या की, शिवविचार घराघरात पोहचविण्याचे चांगले कार्य स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे. बांदा शहरात मुलांसाठी विविध स्पर्धा राबवून त्यांना शिवकार्यात सामावून घेण्याचे शिवधनुष्य प्रतिष्ठानने हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे.
प्रियांका नाईक म्हणाल्या की, पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजणे ही काळाची गरज आहे. प्रतिष्ठानच्या कार्यात समाजाने देखील योगदान देणे आवश्यक आहे. उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत प्रतिष्ठानच्या समाजाभूमीख उपक्रमांचे देखील कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ठ चित्रांचे रेखाटन केले. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, सहखजिनदार प्रथमेश राणे, सहसचिव अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, जे. डी. पाटील, हंसराज गवळे, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, प्रशांत गवस, रीना मोरजकर, मिताली सावंत, वेदिका गावडे, वैदेही वाडकर आदिसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिक्षक, पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =