You are currently viewing “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन

“जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन

“जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात कार्यरत करण्यात आलेला आहे.

या समितीच्या नोडल अधिकारी म्हणून श्रीम. शितल पुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, पंकज कोरगांवकर, मनीष राणे, गणेश जंगले, गणेश परब, अमित तेंडोलकर, सुधीर बालम, सुनिल गिरगांवकर, सुबोध गोसावी, सिद्धेश धुमक, भालचंद्र माळवदे, नंदकिशोर हळदणर, संदेश जुवेकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

            या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्षाशी  संपर्कासाठी ९५५२२८७५५७  या क्रमांकावर किंवा mccsind.zpps2026@Gmail.com  या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे.

समितीस नेमून दिलेली कामे

१.      आचार संहिता कक्ष स्थापन करुन आचार संहिता संबंधिचे सर्व कामकाज करणे.

२.      आचार संहिता भंग विषयक प्राप्त तक्रारी अर्ज संबंधितांकाडे चौकशीसाठी पाठविणे व प्राप्त चौकशी अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्याकडे सादर करणे.

३.      आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात विहित नमुन्यातील लेखी फॅक्सव्दारे व ऑनलाईन दैनिक अहवाल मा. राज्य निवडणुक आयोग यांच्याकडे व त्याची प्रत विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे सादर करणे.

४.    राजकीय पक्ष उमेदवार वगैरे यांच्याकडून सभेबाबत सी.डी.ची प्रमाणित प्रत किंवा निरीक्षणासाठी मागणी अर्ज असल्यास त्यांना संबंधिताकडून सी.डी.ची प्रत मागवून  घेऊन सी. डी. ची प्रमाणित प्रत आवश्यक ती फी वसूल करुन देणे.

५.     उमेदवार, राजकीय पक्ष यांनी आयोजित केलेल्या प्रचार सभांच्या तारखा व वेळा ठिाकण दररोज तहसीलदार  यांच्याकडून मागवून मा. निवडणुक निरीक्षक यांना माहिती पुरविणे.

६.      कोणतेही शासकीय विभागाने आचारसंहिता बाबत मार्गदर्शन मागविल्यास त्याबाबत मार्गदर्शन कराण्याची कार्यवाही करणे.

७.     आचार संहिता विषयक इतर सर्व कामे करणे.

८.     निवडणूकीसंबंधीत उमेदवार यांनी घेतलेल्या निवडणूकीसंबंधित सभा, विविध बातम्यांची कात्रणे एकत्रित करणे व संबंधितांकडून अहवाल मागविणे, निवडणूक निरीक्षक यांना जरुर ती माहिती पुरविणे, तसेच पेड न्यूज, सोशल कमेंट, सोशल मीडिया व इंटरनेट इत्यादींवर लक्ष ठेऊन वेळोवेळी अहवाल सादर करणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा