कणकवली :
शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सकल मराठा समाज कणकवली यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवली पंचायत समिती जवळ छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रम आयोजनानिमित्त सकाळी ठीक ९:०० वा. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, सकाळी १०:०० वा. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, सकळी १०:३० ते दुपारी १२:०० वा. चित्रकला स्पर्धा, रात्री ७ :०० ते ८:०० या वेळेत गुणवंतांचा सत्कार सोहळा व त्यानंतर ८:०० वाजता माझी माय बोली राधानगरी प्रस्तुत साद मराठमोळ्या मनाला, भूपाळी, ओव्या, दिंडी, भारुड, पोवाडा, शेतकरी नृत्ये, लावणी यांचा बहारदार नजराणा, पिंगळा, वासुदेव, अश्या विविध जुन्या आठवणींना उजाळा देणारा गाथा महाराष्ट्राची हा खास कार्यक्रम होणार आहे.