You are currently viewing संभाजीनगरात भव्य कीर्तन महोत्सव….

संभाजीनगरात भव्य कीर्तन महोत्सव….

संभाजीनगरात भव्य कीर्तन महोत्सव….*

चिंचवड (संभाजीनगर) :

संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिर येथे महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. सावरकर प्रतिष्ठान , स्वा. सावरकर मित्र मंडळ , सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, सावरकर महिला मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे हे तिसावे वर्ष आहे.

आळंदी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, वाणीभुषण प्रमोद महाराज जगताप, संतसेवक श्रीकांत महाराज गागरे, सौ. ऋतुजा झेंडे- घिसरे, भागवताचार्य तुकाराम शास्त्री मुंडे आदी कीर्तनकारांच्या कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे.

दररोज विविध संस्थांच्या भजनी मंडळांच्या वतीने भजनाचे कार्यक्रम व रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ होणार आहे.

(सोबत कार्यक्रम पत्रिका पाठवत आहे.)

प्रतिक्रिया व्यक्त करा