You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेत बिनविरोध निकाल
Oplus_16908288

वेंगुर्ला नगरपरिषदेत बिनविरोध निकाल

उपनगराध्यक्षपदी विनायक सदानंद गवंडळकर; दोन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड

वेंगुर्ला :

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विनायक सदानंद गवंडळकर यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया आज नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याच सभेत रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी प्रशांत वसंत आपटे आणि यशवंत लक्ष्मण परब यांची निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांचा नगरपरिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ, रोप व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कार्यालीन अधीक्षक अभिजीत पाटील, सभा अध्यक्ष स्नेहल शिंदे, सभा लिपिक कोमल पावसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस यांच्यासह शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेत सलग बिनविरोध निवडी होत असल्याने स्थानिक पातळीवर राजकीय स्थैर्य निर्माण होत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा