शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत निवड जाहीर; स्वीकृत नगरसेवकांचाही निर्णय निश्चित
नगरपरिषद सभेत राजकीय एकमत; शहर विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक दिपक पाटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना गटनेते पुनम चव्हाण सूचक तर नगरसेवक सहदेव बापर्डेकर अनुमोदक असलेल्या उमेदवारी अर्जावर दिपक पाटकर यांनी शिवसेना व भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता. एकमेव अर्ज असल्याने नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तर भाजपकडून रविकिरण तोरसकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दोघांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर केली. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर तसेच नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांचे नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले.
मालवण नगरपरिषद सभा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, शिवसेना गटनेत्या पुनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, भाजपा गटनेत्या अन्वेषा आचरकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरकर, उबाठा गटनेते महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरेसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर यांसह नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अपक्ष नगरसेवक सुदेश आचरकर यांनी कचरा ठेका विषयावर बोलण्याची परवानगी मागितली. मात्र नगराध्यक्षा यांनी सभेच्या अजेंड्यावर विषय नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी आचरेकर व अन्य नगरसेवक यांनी पुन्हा मागणी केल्यावर नगराध्यक्षा यांनी फक्त चर्चा करूया असे सांगितले. यावेळी सुदेश आचरकर यांनी भूमिका मांडली. तर प्रशासकीय कालावधीतील कामाची माहिती उपलब्ध द्यावी असे मंदार केणी यांनी सांगितले.
महेंद्र म्हाडगुत यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे नगरसेवकांनी मागितलेली माहिती तात्काळ मिळावी असे सांगितले. तर तपस्वी मयेकर यांनी सभागृह कामकाज ऑनलाइन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी महेश कांदळगावकर यांनीही चर्चेत सहभागी होत प्रशासकीय कालावधीतील कामाची माहिती उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, प्रशासकीय कार्यकाळातील माहिती घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या की, मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख लक्ष्य आहे. सर्वांनी एकत्रितपणे शहर विकासासाठी काम करणे आवश्यक आहे. गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय कारभारात झालेल्या कामांची माहिती घेतली जाईल. मालवण शहरातील नागरिकांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गरजेनुसार योग्य भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षनेतृत्वाने संधी दिली आणि सभागृहाने माझी बिनविरोध निवड केली. मी सर्वांचा आभारी आहे. मालवण शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध राहणार आहे. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करुया असे दिपक पाटकर यांनी सांगितले. यावेळी स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर व रविकिरण तोरसकर यांनीही आभार व्यक्त केले. नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची मागणीही तोरसकर यांनी केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नगरपरिषद सभागृहात उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचे अभिनंदन केले. यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, परशुराम पाटकर, मोहन वराडकर, निकीत वराडकर, राजा गांवकर, विजय चव्हाण, राजेश गांवकर, शेखर गाड, जॉन नरोना, स्मृती कांदळगावकर, अर्चना मिठबावकर, जगदीश गांवकर, भाई मांजरेकर, प्रसाद आडवणकर, यशवंत गांवकर, किशन मांजरेकर, सचिन मोर्वेकर, संदीप मालंडकर, संदीप भोजणे, अखिलेश शिंदे, मंदार लुडबे, तेजस लुडबे, विलास मुणगेकर, नंदू देसाई, दत्तात्रय नेरकर, नरेश हुल, नितेश पेडणेकर, ज्योती तोरसकर, मुन्ना फाटक, सौ. तायशेटये यांसह अन्य नागरिक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
