*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”।।श्री भैरवनाथ प्रसन्न।।”*
वंदूया भैरवनाथ गजानन दैवत
संमेलन या वर्षाचे होतं संपन्न।।धृ।।
पौषमासी होते प्रतिवर्षी समारत्न
गावकीचा एकोपा आहे सर्वश्रुत
पूर्वजांची परंपरा सांभाळली सुहृद।।1।।
जांभिवली वसले सह्याद्रीच्या कुशीत
राजनाला जलाने केला काया पालट
रम्य वृक्ष वेलींनी नटला गाव हरित।।2।।
शेतीप्रधान कृषी उद्योग आहे चालत
कष्टकऱ्यांनी हरित क्रांती केली प्रगत
देशोदेशी लौकिक जांभिवली ची ख्यात।।3।।
जपून आहे वारसा संस्कृती संगीत
साक्षरता सुबत्ता सरस्वती नांदे येथ
गुणीजनांचा गौरव होतो संमेलनात।।4।।
आधुनिक यंत्र शेती गावची सत्किर्त
भैरवनाथ मंदिर ग्राम शान श्रीमंत
स्नेह समृद्धी वाढो देवा द्या आशीर्वाद।।5।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
