*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फटकून त्याला मुली टाळती*
फुलून तरारता *जाईजुई*
गंध दरवळतो ओल्या प्रेमाचा
चंद्र रोहिणीचा प्रणय रंगतो
पहात गंधाळलेल्या बागेचा
1
असल्या दूर जरी त्या बागा
तरूण तरुणाई रंगते त्यात
चंद्र दावितो *प्रणय चेष्टा*
आपण आहोत किती सुखात
2
उभी राहून दूर *सदाफुली*
हसतसे आपल्या मैत्रीणीला
ओल्या बागेत गंध दरवळतो
नाहून निथळलेल्या चमेलीला
3
सडा पाहून बकुळ फुलांचा
हंसतो केवडा कुंपणावररती
वैषम्य वाटते *त्यालासुद्धा*
फटकून त्याला मुली टाळती
4
ओला ओला गंध *मातीचा*
प्राजक्ताला करतो *सलाम*
गंधीत करून उपकार केले
वा-यास घातला त्याने लगाम
5
*हसरी बोचरी* बोगनवेल
रंग आकर्षणातून *खुणावते*
नजर ठेवून *ओली* आपली
मधुमालती कमान सांभाळते
6
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
