*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्नातील “स्वप्ना”*
लिहू लागलो कविता जेव्हा
रुसून बसली “कविता” मजवर
स्वप्न ज्ञानपीठचे सत्यात येता
*स्वप्ना* होती मज *बाजेवर*……1
नाही समजले नाते दोघांतील
तरीही राहिलो कविता लिहीत
लेखणीतून प्रसवले काव्य तेव्हा
स्वप्नाने दिले “सुश्राव्य” संगीत …2
लिहीत राहीलो अनंत कविता
पसंत नाही पडल्या स्वप्नाच्या
दुरूस्त केल्या *अनंत* वेळा
तेव्हा कुठे त्या मनात भरल्या…….3
प्रवास स्वप्नांचा भारी किचकट
मधेच भेटतात पोवाडे भारूडे
म्हणत बसतो *उठल्यावरही*
मनात भरता *मोहक रूपडे*……..4
जीवन जहाले *स्वप्न नगरी*
बरसू लागल्या *काव्य* सरी
भान न उरले आता कशाचे
स्वप्नात लिहीतो आता शायरी……5
रचना स्वरचित आहे
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
