*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक समस्यांसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व*
*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर कुठे आहेत, तर ते आहेत शिक्षकांच्या हृदयात!*
*कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणजे विद्यार्थी शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनींची सावली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली……*
*शिक्षकांचा आमदार शिक्षक व्हावा कोकणातील आणि राज्यातील सर्व शिक्षकांनी सर्व मंत्री आमदार यांनी प्रयत्न करून एक सच्चा शिक्षक म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना कोकण विभागातून शिक्षक आमदार म्हणून दिले.*
*निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर तिसऱ्याच दिवशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या आणि शिक्षकांचे आभार मानण्यासाठी हजार झाले होते. आणि त्या दिवसापासून तर आज पर्यंत या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कोकणच नव्हे तर राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी पायाला भिंगरी लावून मंत्रालय, शिक्षण संचालक कार्यालय पुणे, कोल्हापूर आणि मुंबई उपसंचालक कार्यालय, मुंबई सह ठाणे,पालघर, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाचही जिल्ह्यातील जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून या तीन वर्षात दहा हजारापेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेत यांची वैयक्तिक कामे केले आहेत, कोरोनाच्या कालावधीमध्ये मयत झालेल्या 148 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळवून दिल्या पगार सुद्धा सुरू करून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांची थकीत बिले मंजूर करून घेतली आहे, रखडलेल्या मुख्याध्यापक मान्यता शिक्षक मान्यता, पर्यवेक्षक मान्यता , शिक्षकेतर कर्मचारी मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. अनेकांचे शालार्थ आयडी मिळवून दिले आहेत, राज्यातील 521 शिक्षकांना वाढीवपदावर असताना समायोजन करून दिले आहे पगार सुरू करून दिला आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिक्षक आहेत.*
*महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी,सागरी, दुर्गम भाग आहे. या जिल्ह्यातील शिकलेले लोक कामानिमित्त मुंबई व अन्य ठिकाणी विस्थापित होत असल्याने. या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायदा 2009 पारित झाल्याने प्राथमिक वर्गामध्ये 30, उच्च प्राथमिक 35, व माध्यमिक 40 अशी पटसंख्या असावी असे निकष धोरणात्मक आहेत. यासंदर्भात 15 मार्च 2024 नुसार संच मान्यता निकषासंदर्भात काही कठोर निकष वरील प्रमाणे शासनाकडून आले.*
*सदर निकषांमुळे सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी, दुर्गम,डोंगरी भाग आहे , त्या ठिकाणी पटसंख्येचे निकष हे शिथिल केले पाहिजेत याकरता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सर्वात आधी दिनांक 15 मार्च 2024 सदर शासन आदेश रद्द करावा याकरता शासनाला पत्र दिले व तशी मागणी केली. तसेच हा शासन आदेश येण्यापूर्वी विद्यार्थी संख्येची अडचण भविष्यात येईल हे लक्षात घेऊनच तात्कालीन शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक जी केसरकर साहेब यांचे समवेत सिंधुदुर्ग सह अन्य जिल्ह्यात पट संख्येची अट शिथिल करावी याकरता बैठक सुद्धा लावली होती. त्यानंतर सध्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब व अधिकारी यांच्या समवेत राज्यातील सर्व संघटनांना सोबत घेऊन जून 2025 महिन्यामध्ये बैठक लावलेली होती. त्यामध्ये दुर्गम, डोंगराळ भागाला कमीत कमी पटसंख्या ठेवावी. याकरता चर्चा झाली. बैठकीचा निर्णय येण्याअगोदरच, काही संघटना कोर्टामध्ये गेल्या त्यामुळे बैठकीमध्ये झालेला निर्णय पेंडिंग राहिला.*
*त्यानंतर मा. हायकोर्टामध्ये संच मान्यते संदर्भात दिनांक 15 मार्च 2024 नुसार दावा दाखल केलेल्या सर्व शाळा आणि* *संघटनांची लार्जर बेंच ने याचिका फेटाळली व 15 मार्च 2024 चा शासन आदेश कायम ठेवण्याबाबत निर्णय दिला.*
*मुख्याध्यापक संघटना आणि अन्य संघटनांच्या वतीने या शासन निर्णयाविरोधात कोर्टात जाण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. परंतु हायकोर्टाने सदरचा निर्णय दिल्याने पुन्हा कोकणातील कमी पटसंखेच्या शाळांवर टांगती तलवार आली, याकरता मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब व मंत्री महोदय उदय जी सामंत साहेब यांनीही वारंवार शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी चर्चा केली होती, ते स्वतः यामध्ये लक्ष घालून होते.*
*कोर्टाने आदेश दिल्यामुळे माननीय शिक्षण संचालक पुणे यांनी दिनांक 15 डिसेंबर 2025 च्या आत ज्या शाळेची पटसंख्या कमी झालेली आहे , त्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा समायोजन करा असा आदेश काढला होता.*
*सदरचा आदेश थांबवण्याकरता एकमेव आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे हट्ट धरून, माननीय शिक्षण आयुक्त यांचेमार्फत शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश स्थगित करायला लावला हे राज्यातील सर्व शिक्षकांना माहिती आहे. त्यानंतर संच मान्यता आणि शिक्षकांचे पोर्टल अटॅच करण्यात आले, जेवढे शिक्षक संच मान्यतेमध्ये आहेत, तेवढाच शिक्षकांचा पगार निघेल असा आदेश संचालक कार्यालयाकडून आला होता, त्यावर पुन्हा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी संचालकांशी बोलून संचालकांशी बोलून , कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबू नका अशी विनंती केली त्यानुसार सर्वांचे पगार सुरळीत सुरू आहेत.*
*दुर्गम, डोंगराळ,सागरी, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या शिथिल करावी व कमीत कमी पटसंख्या ठेवून मराठी माध्यमाच्या शाळा वाचवाव्यात याकरता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सभागृहामध्ये चार वेळा प्रश्न उपस्थित केलेला आहे, तसेच वारंवार पत्रव्यवहार सुद्धा शासनाकडे केलेला आहे, व त्याचा पाठपुरावा सुरू आहे, आचारसंहिता संपल्यानंतर, माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी दिनांक 15 मार्च 2024 च्या शासन आदेशावर फायनल डिसिजन घेण्यासंदर्भात मिटींग लावण्याचे अस्वस्त केलेले आहे. त्यामुळे कोकणासह अन्य जिल्ह्यातल्या विद्यार्थी शिक्षकांनी काळजी करू नये. कोणतीही शाळा बंद करणार नाही असं शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. कोकणातील माजी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, मंत्री माननीय उदय जी सामंत साहेब, मंत्री माननीय नितेशजी राणे साहेब, राज्यमंत्री श्री योगेशजी कदम साहेब, मंत्री श्री भरतजी गोगावले साहेब, आमदार निरंजन डावखरे व सर्व आमदार या सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.*
*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतः प्रयत्न करून कोकणातल्या सर्व शाळा डिजिटल केले आहेत सुमारे 25 कोटी रुपये चा निधी मिळवून शाळांना विविध साहित्य वाटप केले आहे. त्यामध्ये एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व माध्यमिक शाळांना दोन कोटी रुपयांचे ई लर्निंग चे साहित्य दिले आहे, तात्कालीन पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचेकडून जिल्हा नियोजन फंडातून दोन कोटीचे सोलर पॅनल, व दोन कोटीचे संगणक. असे सहा कोटी रुपयांचे शैक्षणिक साहित्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलेला आहे , एवढा निधी पहिल्यांदाच एका शिक्षक आमदाराने मिळवून दिला म्हणून कोकणातल्या सर्व शाळा खुश आहेत.*
*कोकणशाही पत्रकारांनी कोणतीही बातमी लावण्यापूर्वी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आजपर्यंत केलल कार्य पहिल्यांदा माहिती करून घ्यावे, राज्यातील सर्व सात शिक्षक आमदारांमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे त्यांच्या कामाने उजवे ठरलेले आहेत हे अनेक जण सांगू शकतात, “आमचा आमदार दमदार आमदार”!*
*कोकणातील विद्यार्थी पटसंख्याची अट शिथिल केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही, खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका*
