You are currently viewing बांदा येथे केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

बांदा येथे केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

बांदा

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने १२फेब्रवारी रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी व्हावी यासाठी बांदा केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले .
बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परीक्षेचे उद्घाटन बांदा ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बांदा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या सराव परीक्षेचे रूपाली शिरसाट यांनी कौतुक करून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती सराव पेपर तयार करणेसाठी मेहनत घेतलेल्या रूपियाबी बिजली व प्रशांत पवार यांचा सन्मान करण्यात आला. परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी सुस्मिता मांगले,प्रतिभा घोडगे, मंगल हाडबे, गणेश आत्राम, मालू लांबर, गोपाळ साबळे,सुप्रिया सावंत यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री जे.डी.पाटील तर आभार आनंद कोळापटे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + nineteen =