सावंतवाडी-भटवाडी येथील निवृत्त अधिकारी भास्कर (आप्पा) गोवंडे यांचे निधन
सावंतवाडी :
सावंतवाडी-भटवाडी परिसरातील रहिवासी आणि जिल्हा प्राधिकरणामधून सेवानिवृत्त झालेले भास्कर (आप्पा) बंडू गोवंडे (८२) यांचे मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. सागर गोवंडे व सौ. सुजाता परांजपे यांचे ते वडील होते, तर फ्लाईंग बर्डस् स्कूलचे संस्थापक जयंत परांजपे यांचे ते सासरे होत.
त्यांच्या निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरात शोककळा पसरली आहे.
