*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” चक्रव्यूह “*
आयुष्य गूढ जैसे,एक “चक्रव्यूह” आहे
जल शांत भासे तरीही,जलचक्र आंत आहे
येथे बहाल झाली,नाती ॠणानुबंधे
कर्तव्य पूर्ती होई,देवाचीया प्रबंधे
प्रारब्ध कर्म जेव्हा,सांगे भविष्यवाणी
अपराधी या मनाची,ठरली गूढ कहाणी
मन चिंब आज भिजले, प्रतिकूल पावसाने
केले कठिण जगणे,या गूढ नियतीने
आभास फक्त होई,क्षितीजी उष:प्रभेचा
पण वाळवंट झाले,हा भोग प्राक्तनाचा
केले सक्तीचे”जगणे, रहस्यमयी या “जन्माने”
भोगून सर्व भोग,जावे “गंतव्य” स्थाने
उतरण,चढण, काटेरी,
मार्गीका असे सुख दुःखाची
प्रतिक्षा असे मज, शितल, शांत मनःस्वास्थ्याची
“कळसूत्री बाहुली” हे जीवन आहे,
सूत्रधार तो”दयानिधी”
सूत्र सोडता”खेळ संपण्या
नाही क्षणाचा अवधी
अजब, अद्भूत “चक्रव्यूह” हे
आहे एक रहस्य
“काळ” सदोदित गर्जून करतो
विकट विकट हास्य……………….
रचना:—- मोहन मराठे….
