You are currently viewing सावंतवाडी व्यापारी संघाकडून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे अभिनंदन  ​

सावंतवाडी व्यापारी संघाकडून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे अभिनंदन ​

सावंतवाडी व्यापारी संघाकडून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे अभिनंदन

​सावंतवाडी
सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यवसायिक संघातर्फे सावंतवाडी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांची आज दुपारी सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या भेटीदरम्यान व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांनी सावंतवाडी शहरातील व्यापारी बांधवांना भेडसावणाऱ्या पार्किंग व इतर समस्यांबाबत नगराध्यक्षांशी चर्चा केली. या समस्यांच्या निराकरणासाठी लवकरच सविस्तर भेट घेऊन चर्चा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

​या प्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर, माजी सेक्रेटरी श्री. बाळासाहेब बोर्डेकर, संघाचे उपाध्यक्ष व नगरसेवक श्री. आनंद नेवगी, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी अध्यक्ष श्री. हेमंत मुज, सेक्रेटरी श्री. किरण सिद्दये, सदस्य श्री. संदेश परब, सदस्य श्री. दत्ताराम सावंत, नगरसेवक श्री. सुधीर आडीवरेकर व नगरसेवक प्रतीक बांदेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा