You are currently viewing शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

कणकवली :

शिवसेनेचे आमदार श्री. किरणशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरणशेठ सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तसेच जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी बोलताना शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे यांनी, आमदार किरणशेठ सामंत हे आपल्या राजकीय व संघटनात्मक वाटचालीतील आधारस्तंभ व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी ठरत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख श्री. संदेश सावंत पटेल हे उपस्थित होते. ही भेट अत्यंत आपुलकीच्या आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा