You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात दि.८ रोजी तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध या विषयावर कार्यशाळा

वैभववाडी महाविद्यालयात दि.८ रोजी तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध या विषयावर कार्यशाळा

*वैभववाडी महाविद्यालयात दि.८ रोजी तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध या विषयावर कार्यशाळा*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वा. “तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक ताण, तणाव हाताळण्याच्या प्रभावी पद्धती तसेच आत्महत्येपासून प्रतिबंधासाठी आवश्यक जनजागृती या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तणाव ओळखणे, त्यावर उपाययोजना, सकारात्मक जीवनशैली, समुपदेशनाचे महत्त्व व आत्महत्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक उपस्थित राहणार असून कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यशाळेला विद्यार्थी व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. एन. वी गवळी व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर एम गुलदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा