वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील पालकरवाडी वतोरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा समीर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवार दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील व अध्यासी अधिकारी व्ही. जी. सावंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
उपसरपंच नंदिता शेर्लेकर यांनी २४ डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर आज रिक्त जागेसाठी ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी ग्रा. पं. सदस्य आबा कापडी, दिनकर पालव, नंदिता शेर्लेकर, विकास अणसुरकर, उमा करंगुटकर, संगीता परब, सौ. पालकर, दीपक मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी निवड जाहीर झाल्यानंतर सूर्याजी नाईक, पोलिस पाटील समीर गोसावी, नारायण शेर्लेकर, दीपक करंगुटकर, ज्ञानदेव लटम, भाऊ गावडे, बाळा गावडे, सुधीर गावडे, आबा येरेम, सुदेश गोसावी आदी ग्रामस्थांनी सौ. गोसावी यांचे अभिनंदन केले.
