*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उब मिठीतील तेव्हा कळते*
आम्ही खलाशी सदा उपाशी
जीवन शैली आमची खाशी
बोटी आमच्या जरी धावती
भेट अवघड *पत्नी मुलांशी*….1
शिक्षा भोगत गेल्या जन्मीची
तरंगत असतो खा-या जगात
मिठीत घेऊन दिठी उशीची
आमची आहे अजब जमात……2
खायला उठते रजनी काळी
आठवत असते पत्नी सावळी
जरी तळमळतो पूर्ण *रात्र*
सकाळी करतो पहिली पाळी….3
चळीष्ट असून नाही भागत
मिठीत घ्यायला मिळणार कोण
दु:ख आमचे आम्हास माहीत
कसे अनुभवणार हनीमून क्षण..4
गणित मिठीचे असून अवघड
धडधड हृदयाची कळणार कशी
आभासी पणाचे *रुक्ष* डोहाळे .
जमवून घेतील आवळे *चिंचेशी* .5
एका मिठीतील *उब प्रसवते*
बोटी सारखा पाळणा हलवते
डीएनए कळतो खलाशी बापाचा
*उब मिठीतील तेव्हा कळते*….6
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
