*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, समाजसेविका, अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय सावित्री*
माय सावित्री
कितली वर्णू तुनी थोरवी
तुनामुयेच आमले
जगानी दृष्टी भेटनी नवी
जोतिबासारखा झंझावातले
तू दिनी मोठी साथ
तुम्ही दोनीसनी मिळीसन
कायवर कयी मात
म्हणीसन मानव
गुलामगिरीमातून मुक्त झाया
अस्पृश्यना कलंक दूर करीसन
तुम्ही वाटा ज्ञानना उजेड
माय सावित्री
तू या देशमातली पहिली
मास्तरीण
दगडगोटा झेलात पन
तू तुनी वाट सोडी नही
म्हणीसन या देशमा
क्रांती झाली
शिक्षणनी पहाट
घर घरमा ऊनी
माय सावित्री
आम्हीबी चालत राहसूत
तुनाच वाटवर
उजेड वाटत!
अनुपमा जाधव
डहाणू
