You are currently viewing काळसे येथे बीएसएनएल मोबाईल टॉवरचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन….

काळसे येथे बीएसएनएल मोबाईल टॉवरचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन….

मालवण

काळसे गावात मोबाईल टॉवर उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून गेली अनेक वर्षे केली जात होती. आमदार सुनील प्रभू यांनीही टॉवर उभारणी व्हावी यासाठी विशेष मागणी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेतला. या टॉवरचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काळसे माळकेवाडी येथे सोमवारी करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी विनोद गोसावी, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कमलाकर गावडे, बाळ महाभोज, अण्णा गुराम, राजू परब, जमीन मालक संतोष सावंत, अमोल गोसावी, बीएसएनएल अधिकारी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विनोद गोसावी यांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नाईक म्हणाले, आमदार सुनील प्रभू यांचे काळसे गावच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासदार विनायक राऊत यांनी पहिल्या १० टॉवर मध्ये हा टॉवर मंजूर करून घेतला. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले होते. मात्र आगामी दोन महिन्यात टॉवरचे काम पूर्ण होईल. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी विनोद गोसावी यांनी गावातील अन्य प्रश्न व समस्या याबाबत ग्रामस्थांच्या वतीने माहिती दिली. तसेच झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल गोसावी यांनी केले तर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आभार मानले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा