मनसेचे जिल्हा कार्यकारणीची 2 जानेवारीला कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक
कुडाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्ह्या कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 02/01/2026 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट सरकारी रुग्णालया समोर कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धिरज परब जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व जिल्हा सचिव बाळा पावसकर तसेच सचिन तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मनसे जिल्हा कार्यकारणी बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा सचिव, शहराध्यक्ष, उप तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आदी पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.
