पुणे:
तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित नवरात्री निमित्त अकरा दिवसाच्या लेखन उपक्रमांत पुणे येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्रबुध्दे यांना सातत्याने तीन दिवस उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित स्पर्धेत कवयित्री उज्वला सहस्रबुद्धे यांनी सहभाग घेऊन सातत्यपूर्ण लेखन केले होते. त्यांच्या लेखन कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना सन्मानित केले आहे.
सदर उपक्रमांत (घटस्थापना, कुलदेवता), (अभंग रचना), (ललिता पंचमी) अशा तीन स्पर्धांमध्ये त्यांनी यश प्राप्त केले. सलग ११ दिवस काव्य लेखन केल्याबद्दल सरस्वतीची प्रेम भेट म्हणून देण्यात आली. हा कार्यक्रम सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बावधन येथे संपन्न झाला.
