You are currently viewing नेमळे येथे डबल बारी भजन कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन

नेमळे येथे डबल बारी भजन कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन

भजनातून संस्कृती व अध्यात्म जपले जाते – संदिप गावडे

सावंतवाडी :

नेमळे येथील जय गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने KSR ग्लोबल एक्वेरियम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या डबल बारी भजन कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री. गावडे म्हणाले की, “भजन हे अध्यात्म आणि संगीत यांचा उत्तम संगम आहे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि अध्यात्मिक मूल्यांची जोपासना भजनाच्या माध्यमातून पूर्वीपासूनच होत आली आहे.”

या कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. अनिल निरवडेकर, युवा मोर्चा आंबोली मंडळाचे सरचिटणीस विघ्नेश मालवणकर, नेमळे गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा