तरळे येथे शोकाकुल कुटुंबीयांची पालकमंत्री नितेशजी राणे यांची सांत्वन भेट
कणकवली
कणकवली तालुक्यातील तरळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. वंदना खटावकर यांच्या सुनबाई सौ. प्रीती खटावकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. या दुःखद घटनेनंतर माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी खटावकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री नितेशजी राणे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या कठीण प्रसंगी धैर्याने सामना करण्याचे बळ दिले. त्यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत खटावकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या.
