You are currently viewing मुंबई–गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पुलाजवळ भीषण अपघात

मुंबई–गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पुलाजवळ भीषण अपघात

मुंबई–गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पुलाजवळ भीषण अपघात;

कारचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली

कुडाळ

मुंबई–गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे पुलाजवळ आज पहाटेच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन थेट खाली कोसळली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वेताळ बांबर्डे पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याखाली कोसळली. पहाटेची वेळ असल्याने अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारचा चक्काचूर झाला आहे.
सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, वेताळ बांबर्डे पुलाचा परिसर अपघाताच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा