You are currently viewing उघडून विश्वात नवीन दुकान

उघडून विश्वात नवीन दुकान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*उघडून विश्वात नवीन दुकान*

 

मुहूर्त साधून ख्रिस्त जन्माचा

आज उतरले पहिले विमान

परिचित झाली *नवी मुंबई*

उघडून विश्वात नवीन दुकान…..

विरोध झाले मोर्चे निघाले

विरोधक सारे एक जहाले

चुचकारून सर्व पोटदुखेंना

औषध देऊन गप्प बसविले…..

नसून योगदान *दमडीचे*

आव आणतात *धनकोचा*

मुतले नाहीत करंगळीवर

तरी विषय बनवला प्रतिष्ठेचा ….

नसून किंमत करती वसूल

लोकशाहीतील हेच “खडे”

शेकडो पटीने वाढते किंमत

विकास हल्ली महागात पडे……

उशीर असतो आधी झालेला

*त्यांतून आमची पोटे भरा*

मोर्चे स्पेशालिस्ट उभे ठाकती

सिध्द करायला *परंपरा*…….,

अखेर उतरले विमान पहिले

आठ वाजता भल्या सकाळी

काय वर्णावा मोद “यात्रींचा”

सुखद गारठ्यात प्रात:काळी……

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा