*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मला कुठेही टाकून देता*
म्हणतात साले सनातनी
झाडाखाली *गेले ठेवून*
कचरा पडतोय डोक्यावर
श्रध्दा गेली *सारी आटून*….
लाडू मोदक सारे गिळती
आठवण फक्त खायची
माझे *नाव* पुढे करून
टिमकी आपली वाजवती……
झेपत नाही पुजता कशाला
मिरवता फक्त भक्त म्हणून
नवतो आलो पाय धरायला
दाखवा एका जागी बसून……
नको तेथे शायनिंग मारता
आंघोळीलाही देता सुट्टी
असले संस्कार काय कामाचे
घ्यायला हवी तुमच्याशी कट्टी…
शिकून इंग्रजी फुटली शिंगे
श्रध्दा झाली निसरडी आता
उत्सवाचा *करून देखावा*
*मला कुठेही टाकून देता*….
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
