*मांडकुली भोईवाडी-मळावाडी रस्त्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ५ लाखाचा निधी मंजूर*
*वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले भूमिपूजन*
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कुल मार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी ५ लाख रु मंजूर केले असून आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व जमीन मालक ग्रामस्थ विजय परब यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, मा.सरपंच तुषार सामंत,धनवान खवणेकर, गोविंद अणसूरकर, चेतन सावंत, बाबी राऊळ, महादेव भोई, अमित तांबूळकर, उल्हास भोई, शशांक नार्वेकर, चैतन्य भोई, मानसी नार्वेकर, सुवर्णा माळगावकर, उषा भोई, सुनील पिंगुळकर, नामदेव भोई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
