You are currently viewing पंतप्रधान मोदी या योजनेतून मिळवतात लाखो रुपये.. आता तुम्ही सुद्धा मिळवू शकता

पंतप्रधान मोदी या योजनेतून मिळवतात लाखो रुपये.. आता तुम्ही सुद्धा मिळवू शकता

तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गुंतवणूक करण्यासाठी थोडं संशोधन करायला हवे. तसेच तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्यावर वारंवार माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जो गुंतवणूकदार तोटा सहन करु शकत नाही. जसे की, निवृत्त झालेले गुंतवणूकदार, निवृत्तीच्या जवळी असलेले लोकं यांसाठी असे काही पर्याय शोधले पाहिजेत जिथून पैसे परत मिळण्याची हमी दिली जाईल आणि तोटा येणार नाही. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यामध्ये पैसे परत मिळण्याची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये कोणताही धोका नाही. तसेच पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेच्या माध्यमातून तुम्ही मोठी रक्कम परताव्याच्या स्वरुपात मिळवू शकता.

पंतप्रधान मोदींनीही केले गुंतवणूक

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत.

परंतु यामध्ये एक योजना अशी आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (एनएससी) अंतर्गत गुंतवणूक करुन तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता. या योजनेचा कार्यकाळ (मॅच्योरिटी) हा ५ वर्षांचा आहे. योजनेमध्ये वर्षाला ६.५ टक्के व्याज दिले आहेत. हे लक्षात ठेवा की इतर लहान बचत योजनांप्रमाणेच एनएससीवरील व्याज दराचा देखील प्रत्येक तिमाहीवर आढावा घेतला जातो.

मोंदींनी गुंतवले ८ लाखांपेक्षा अधिक रुपये

एनएससीची मॅच्युरिटी वेळ ५ वर्षांची आहे. तुम्ही याची मॅच्युरिटी पुढे वाढवूही शकतो. गुतंवणूकीची वेळ वाढवल्यास तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. या योजनेत तुम्ही १००० रुपयांचीही गुंतवणूक करु शकता. अधिक रक्कमेची काही मर्यादाही या योजनेत नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनएससी या योजनेत मागील वर्षी ८ लाखांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आहे.

एनएससी केलेल्या गुंतवणूकीवर तुम्हाला सेक्शन ८० सीअंतर्गत करसवलतही मिळते. या योजनेत तुम्ही एकटे कींवा संयुक्त पद्धतीनेही खाते उघडू शकता. १० वर्षांवरील मुलांचेही या योजनेमध्ये खाते उघडू शकता. तुम्हाला योजनेची मॅच्युरीटी संपल्यावर सर्व रक्कम मिळते.

खाते करु शकता हस्तांतरित

एनएससी वर उपलब्ध असलेली आणखी एक मोठी सुविधा म्हणजे दुसर्‍याच्या नावे खाते हस्तांतरित करणे. जुनी प्रमाणपत्रे हस्तांतरित करताना सोडली जात नाहीत, परंतु त्याऐवजी आपण ज्या एनएससीचे हस्तांतरण करीत आहात त्याचे नाव त्या प्रमाणपत्रांवर नोंदले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा