*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धर्म*
तो धर्म मानवांचा
शोधू कसा कुठे रे
नवरत्नाच्या गाभाऱ्यात
तो लपला असेल का रे..
का मडविला सुवर्णानी
देवालई धर्म तुमचा
का शिखरावरत मोतीयानी
चढवीला धर्म तुमचा.
असेल ऐक्य भारताचे
सांगेल का धर्म तुमचा
चातुरवर्ण व्यवस्था
मोडेल का धर्म तुमचा.
भय धर्म मार्तंडांचे
इथे तांडव चालते रे
मांडव सोनियांचे
रोज नव्याने उभारते रे
मोडा कळस धर्मांधतेचे
नवराष्ट्र निरमुया रे
नसेल कोणी भुकेकंगाल
तो दिवस पाहू या रे
ना थांबणे इथेच कोनी
जाऊ पुढे चला रे
नवं राष्ट्रनिर्मिन्यासाठी
कारवा सुरु करा रे.
विद्रोही
भूमिपुत्र वाघ, धाराशिव
9172972482
