पुणे :
पुणे येथील साहित्य सम्राट संस्थेचा काव्य बोले काळजाला हा विनोदातून प्रबोधन करणारा उपक्रमात काव्यात्मक सोनेरी बरसात बसली यात रसिक श्रोत्यांनी या बरसातीचा मनमुरादपणे आस्वाद घेतला शेतकरी दिनानिमित्त हडपसर येथील सुवर्णपेढी चंदूकाका सराफ शाखेत हा काव्यात्मक कार्यक्रम पार पडला . हडपसर शाखेचे व्यवस्थापक नवनाथ गिरे, तेजस कामटे, ओंकार तिवारी, पूजा मोरे, पूनम वाघमारे, रूपाली भालेकर, प्रियंका थोरात, अनिल एकळ, कुणाल मते, श्रुतिका मते, श्रुतिका अहिरे उपस्थित होते २१३वे कवीसंमेलन चंदू काका सराफ यांच्या सुवर्ण दालनात शब्दांच्या सुवर्ण काव्यात्यमकाची बरसात कवीनी सादर केली असून हा सुवर्णयोगच म्हणावा. असे साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी मनोगतात व्यक्त केले.
शेतकरी दिनाच्या कवी संमेलनामध्ये कवी गणेश पुंडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी बहारदार कविता सादर केली.
निसर्गाची साथ नाही कोणाचा भरोसा
जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा
कवी विनोद अष्टुळ शेतकऱ्यांचा जीवनसाथी सर्जा राजा या बैल जोडीच्या कष्टावर भाष्य करणाऱ्या लोकगीतात ते म्हणतात –
गाडी नांगर अजून अवताला
काळ्याआईची चाकरी वकताला
हिरवं सपान फुलबी घामानं रं
कसा चालतोय सर्जा डौलानं
तसा राजा बी माझा जोमानं रं
कवियत्री उमा लुकडे यांनी आपल्या गोड आवाजात शेतकरी भाऊ यांच्यावर ओवी सादर केली.
बंधू राजाच्या वावरी जोमात केळीची बाग
रात दिन राबतोया धाडसी तो ढाण्या वाघ
कवी गौरव नेवसे आपल्या कवितेत वास्तविकतेचा संदेश देतात –
सोना पिकवतोय बळीराजा
त्याचा तो भाव कवडीमोल
एक दिस कष्ट करू रानात
शेतकरी दिन होई अनमोल
आणि कवी तानाजी शिंदे आपल्या कवितेत खरा शेतकरी उभा करतात –
दुःख केवढे मनात माझ्या
मी कुणा पुढे मांडत नाही
तू जिंकलास रे आभाळा
मी तुझ्या सारखे आसवे सांडत नाही
या शेतकऱ्यांच्या जीवनावरील कवीसंमेलनामध्ये चंदूकाका सराफ या प्रसिद्ध सुवर्णपेढीतील अनेक रसिक ग्राहकांनी काव्यात्मक सोनेरी बरसातीचा मनमुरादपणे आस्वाद मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नवनाथ गिरे यांनी केले .मान्यवर कवींना वृक्षाचे रोप व शाल देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार शाखेतील अमोल माने यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले.
