You are currently viewing वाडा येथे सिलेंडर भरलेला ट्रक उलटला…..

वाडा येथे सिलेंडर भरलेला ट्रक उलटला…..

देवगड

वाडा विष्णू मंदिर येथे चढावावर सिलेंडर भरलेला ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. या ट्रक मध्ये गो कंपनीचे सिलेंडर होते. हा अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. देवगडहून पडेल कडे जाणारा कंपनीचा ट्रक विष्णू मंदिर येथील चढावावर अडकला आणि पलटी झाला.

गावातील सामाजिक कार्यकर्ते उत्तम बिरंजे बिरजे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी सागर कांदळकर, उत्तम बिर्जे, संतोष मुळम, योगेश कोकाटे, प्रवीण बिर्जे, अशोक आचरेकर, दशरथ आचरेकर, वसंत आचरेकर, जयवंत शिंदे, देवेंद्र आचरेकर, अण्णा घाडी, या सर्वांनी जीवाची परवा न करता भरलेल्या सिलेंडर ची गाडी रिकामी करून एका बाजूला केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − eight =