You are currently viewing आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट

*आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रियेकरीता आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी.*

*ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोंबर- नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी अनेक शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. यावर राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांकरिता नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली असून यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याची अट ठेवण्यात आली असून सदर ई केवायसी 25 डिसेंबर पूर्वी करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. सदरची ई केवायसी करतांना जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 100/200/300 रुपये नियमबाह्य पद्धतीने दर आकारणी करून पिळवणूक करत आहेत. यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून सर्व आपले सेवा केंद्र धारकांना केवायसी साठी दर निश्चित करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची लूटमार होणार नाही. तसेच सदरची ई-केवायसी प्रक्रिया ग्रामपंचायत कडील सेवा केंद्रामार्फत प्राधान्याने करून देण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा