रत्नागिरी :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट (BKVTI) यांच्या तर्फे आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
ही कार्यशाळा प्रितम पावसकर मॅडम यांनी घेतली. या कार्यशाळेमध्ये फॅब्रिक पेंटिंगची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच रंगांची निवड, ब्रशचा वापर, डिझाइन ट्रान्सफर, रंग टिकवण्याच्या महत्त्वाच्या टिप्स समजावून सांगण्यात आल्या.
कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला व स्वतः फॅब्रिक पेंटिंग करून आनंद घेतला. ही कार्यशाळा माहितीपूर्ण, उपयुक्त व आनंददायी ठरली.
